कळस नसलेले मंदिर बघायचंय तर चला चंद्रपूरला...
चंद्रपूर : इतिहासाच्या अंधार गुहेत अनेक रंजक कथा दडून बसल्या आहेत. अशीच एक कथा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वांत भव्य असलेल्या प्राचीन मंदिराची. हे मंदिर भोंडा महादेव नावाने ओळखले जाते. कधीकाळी या प्राचीन मंदिराच्या कळसावर वीज कोसळली होती. पुननिर्मित करताना कळसाविनाच बांधकाम करण्यात आले. मंदिराच्या डोक्यावर कळस आणि अमलक नसल्याने या मंदिराला भोंडा महादेव असे नाव पडले. उत्कृष्ट शिल्पकलेची साक्ष देत हजारो वर्षांपासून हे मंदिर उभे आहे. (व्हिडिओ : बालकदास मोटघरे)
#Temple #Chandrapur #Vidarbha #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral