कोल्हापूर - कोल्हापूरची खासियत असलेल्या ठुशी दागिन्यालाही लॉकडाउनचा फटका बसला आहे. ठुशीसाठी लागणारे "लाखी पोकळ' मणी हे फक्त कोल्हापुरातच तयार होतात. देशातील विविध ठिकाणांसह परदेशातही या मण्यांना मागणी असते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐन लग्नसराईत ठुशी कारागिरांना मंदीचा सामना करावा लागत आहे. त्यातच पर्यटन थांबल्याने ठुशीची मागणीही घटली. परिणामी कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
व्हिडिओ - बी. डी. चेचर