जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून नऊ गावात घनकचरा प्रक्रिया करणारे मशीन देण्यात आले. त्यासाठी 40 लाख रुपये खर्च आला आहे. एक वर्षापूर्वीच या मशीनचा पुरवठा संबंधित गावांना करण्यात आला आहे. यातील एक मशीन बांबवडे येथे बसविण्यात आले आहे. मात्र वर्षभरात एक किलो घनकचरा प्रक्रिया झालेली नाही ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचे प्रबोधन झाले नसल्याचा आरोप सरपंच , माजी पदाधिकारी यांनी केला आहे. या मशीनच्या विजेचा खर्च मोठा असल्याने ग्रामपंचायतीने याचा वापर केलेला नाही. तर वर्षभरात पाणी स्वच्छता विभागानेही कधी ग्रामपंचायतीकडे याबाबतची चौकशी केली नाही .आता मंत्रालयातून चौकशी समिती येणार असल्याने घाईगडबडीत मागील दोन दिवसात या मशीन साठी शेड उभे करण्यात आलेले आहे .त्या शेडमध्ये हे मशीन ठेवण्यात आले आहे .मात्र अजूनही त्याला वीजपुरवठा झालेला नाही. हीच तत्परता यापूर्वी दाखवली असती आणि ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींचे प्रबोधन केले असते तर कदाचित या मशिनचा वापर झाला असता . मात्र पाणी व स्वच्छता विभाग हा विषय कधीच गांभीर्याने घेतला नसल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
रिपोर्टर : सदानंद पाटील
व्हिडिओ : सुयोग घाटगे
Comments