• 6 years ago
अकोला : वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण पाहण्याचा अकोलेकरांनी घेतला अनुभव या वर्षातील कंकनाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव अकोल्यातील अनेक नागरिकांनी घेतला. घराच्या छतावर जाऊन काहींनी सूर्यग्रहण पाहले, सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी कधीही बघू नये अशी चर्चा नेहमी होत असते म्हणून अकोल्यातील विविध परिसरात सूर्यग्रहण बघण्यासाठी काळा चष्म्या तर अनेकांनी काळा काच, एक्स-रे फोटोचा वापर करून सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. अकोल्यात आज सकाळपासूनच आकाश स्वच्छ असल्याने ढगाळ वातावरण नसल्याने या सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घेता आल्याचे दिसून आले. दरम्यान, ग्रामीण भागात आजही सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण पाहताना अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा पाळत असून, महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात सूर्यग्रहण कालावधीत अंधश्रद्धा पाळल्या जातात.
(व्हिडीओ : अमित गावंडे, अकोला)
#solareclips #Akola #Vidharbha #EsakalNews #MarathiNews #SakalNews #Viral #Breaking

Category

🗞
News

Recommended