• 6 years ago
आर. के. नगर(कोल्हापूर) - आबालवृद्धांना संस्कृती, संस्काराची शिकवण देणाऱ्या वासुदेवावरही कोरोनाचे संकट आले आहे. लॉकडाउनमुळे लोकं दारातही थांबवत नाहीत, तरीही आम्ही पोटाचा धंदा आहे म्हणून फिरतोय, असे तो सांगतो. एवढंच नव्हे, तर नोटांऐवजी चिल्लर हातात पडत आहे. बारामतीतून आलेला हा वासुदेव म्हणजे रोहन मालोजी गदाई सांगत होता. 18 वर्षांचा हा तरुण अलीकडे उपनगरातील गल्लोगल्ली फिरत आहे. चिपळ्या वाजवत "तुळस हिरवीगार मानवा, तुळस हिरवीगार' हा अभंग म्हणत हा वासुदेव एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत निघून जात आहे. अभंगातून संस्काराची पेरणी करीत आहे.

व्हिडिओ - लुमाकांत नलवडे

Category

🗞
News

Recommended