• 6 years ago
औरंगाबाद : वाळूजमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. वाळुज औद्योगिक परीसरातील पंढरपूर, बजाजनगर, रांजणगाव शेणपुंजी हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. असे असताना शनिवारी (ता.२७) वाळुज येथे सुमारे ५०० शिक्षकांना कोवीड प्रतिबंधात्मक कार्यवाहीसंबंधी एकत्रित प्रशिक्षण देण्यात आले. कोविड प्रतिबंधात्मक प्रशिक्षणाला इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांना बोलवण्यात आल्याने शिक्षकांच्या सुरक्षेचाच प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

(व्हिडीओ - संदीप लांडगे)

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews

Category

🗞
News

Recommended