• 6 years ago
चंद्रपूर : लॉकडाउनमुळे सर्व क्षेत्रे कुलुपबंद झालीत. प्रत्येकजण घरी राहून सुरक्षितता पाळत होता. या संकटकाळात सोबतीला मोबाईल होता. या मोबाईलचा समाजातील काहींनी चुकीच्या कामासाठी वापर केल्याचे समोर आले. मोबाईलवर संपर्क साधायला. त्यातून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करायचे. फूस लावून पळवून न्यायचे, असे प्रकार वाढले. मागील तीन महिन्यांत तब्बल सोळा प्रकरणे चंद्रपूर जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत कार्यरत जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडे प्राप्त झाली आहेत. (व्हिडिओ : साईनाथ सोनटक्‍के)

Category

🗞
News

Recommended