अकोले : गेल्या महिन्यात विश्वास शिंदे व स्वाती शिंदे मुलुंड येथून आपल्या गावी शिळवंड घोटी येथे आले. अगोदर संस्थात्मक कोरंटाईन झाले मात्र त्याच काळात त्याच्या मुलीला पहाटे सर्पदंश झाला. तिला घेऊन हे दोघे कोतुळ ग्रामीण रुग्णालयात आले मात्र तिथे त्यांचे काही एक न ऐकता तुमच्या मुलीला कोरोनासारखे सिम्टन असल्याने तिला संगमनेर येथे हलविण्यात आले. मात्र रुग्णवाहिकेत ना ऑक्सिजन , ना डॉकटर ,ना नर्स , ना सलाईन त्यामुळे ती मुलगी रस्त्यातच मृत झाली त्याला महिना उलटून गेला आपली मुलगी कशाने मृत झाली त्याचे मृत सर्टिफिकेट मागण्यासाठी हे कुटुंब रोज चकरा मारते मात्र त्यांना न्याय मिळत नसल्याने त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला असून त्यानी सकाळ प्रतिनिधी शी बोलताना आपली व्यथा सांगताना अश्रूंचा बांध फुटला .याबाबत मृत मुलीचे वडील विश्वास शिंदे यांनी सांगितले माझी मुलगी आनन्या वय ५ वर्षे हिस सर्पदंश झाला मी त्या सापाला मारले व मुलीला घेऊन सात वाजता ग्रामीण रुग्णालय कोतुळ येथे त्याठिकाणी लोहकरे सिस्टर व अन्य महिला कर्मचारी होत्या त्यांनी अगोदर लक्ष्य दिले नाही नंतर मला एक ६८ रुपयांचे इंजेक्शन आणण्यास सांगितले त्याप्रमाणे मी आणून दिले.
#sakalnews #viral #trending #marathinews #crimenews #sakalmedia