वेलतूर (जि. नागपूर) : आधी काजवे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते 10 ते 15 जूनपर्यंत बघायला मिळत होते. परंतु, यावर्षी म्हणजे 2020 मध्ये मे महिन्यात 13 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे काजवे लवकर निघाले. ज्या काजव्याचा कालावधी 15 दिवसांचा होता तो या वेळेस एक महिना अनुभवता येत आहे. लॉकडाउनमुळे ना लोकांची वरदळ ना आवाज ना कसला प्रकाश यामुळे हे शक्य झाल्याचे अभ्यासक सांगत आहेत. (व्हिडिओ : शरद शहारे)