• 6 years ago
चंद्रपूर : जिल्ह्यातील "दुधाळा' गावावर टाळेबंदीत संकट कोसळले आहे. गावाचा नावाप्रमाणेच दुधाळ्यातील दूध, दही फेमस आहे. चंद्रपूर शहरातील घराघरात दुधाळ्याचे दूध-दही पोहोचते. गावाचा हाच मुख्य व्यवसाय! टाळेबंदीत मात्र दुधाळ्यातील दूध-दही नासले आहे. चंद्रपूर शहरात दही-दूध नेण्यासाठी साधने उपलब्ध नाहीत. संचारबंदीचे नियमही दूध व्यवसायाला मारक ठरले आहेत. मार्च महिण्यापासून गावाची हमखास होणारी कमाई थांबली आहे. यामुळे गावात आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. (व्हिडिओ : श्रीकांत पेशेट्टीवार)

Category

🗞
News

Recommended