चंद्रपूर : शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा जपता यावा म्हणून तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने १९९० च्या सुमारास नेताजी भवन नावाने नाट्यगृह बांधले. सुमारे ७५० आसनाची येथे व्यवस्था केली. या कामावर तब्बल ४० ते ४५ लाखांचा खर्च केला. नाट्य कलावंतांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश होता. मात्र, या सभागृहात अनेक असुविधा आहेत. पार्किंगची व्यवस्था नाही. बोटावर मोजण्याएवढे कार्यक्रम झाले. मागील ३० वर्षांपासून सभागृह कुलुपबंद आहे.
(व्हिडिओ : साईनाथ सोनटक्के)