यवतमाळ : शेताला कुंपन नसेल तर जंगली जनावर, मोकाट जनावरांचा मोठा त्रास असतो. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. यासाठी काही लोक इलेक्ट्रिक करंट लावतात. यामध्ये कधी मनुष्यहानी पण होऊ शकते, हे धोक्याचेच आहे. तार कंपाउंड (कुंपन) करणे खर्चाचे असते. ते सर्व शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे आठ एकर शेताला करवंद लावली. करवंदाच्या फांद्या जमिनीपासून असतात आणि करवंदाला भरपूर काटे असतात त्यामुळे त्याचं झुडूप सारखं बन तयार होतं. यामुळे रानडुकरे, रोही यांच्यापासून बचाव होतो. एका झाडाला कमीत कमी 15 किलो करवंद येतात. आज 50 ते 60 रुपये किलोने करवंद बाजारात विक्रीला आहे. त्यामुळे हे फायद्याचे आहे. असा प्रयोग आपणही करुन बघावा. (व्हिडिओ : राजकुमार भीतकर)