• 6 years ago
राजुरा (जिल्हा चंद्रपूर) : जिल्ह्यातील राजुरा तालुक्‍यात ब्रिटिशकालीन तलाव अलीकडे पर्यावरणीय प्रदूषणाच्या संकटात सापडलेला आहे. तब्बल 60 वर्षांपासून पहिल्यांदाच या तलावांमध्ये इकॉर्निया जलीय वनस्पती प्रचंड वाढली आहे. शिवाय शहरातील दूषित सांडपाणी तलावात सोडण्यात येत असल्यामुळे तलावाचे पाणी दूषित झाले आहे. याचा सर्वात मोठा फटका स्थानिक मच्छिंद्र मच्छिमार सहकारी सेवा संस्थेला बसला. शेकडो कुटुंब मत्स्यपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र तलावातील पाणी दूषित झाल्यामुळे मत्स्यपालन व्यवसायावर सुद्धा परिणाम होत असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
(व्हिडिओ : आनंद चलाख, श्रीकांत पेशट्टीवार)

Category

🗞
News

Recommended