महापालिकेतील अधिकाऱ्यांना शिविगाळ केल्याच्या निषेध करीत युवक कॉंग्रेसने सोमवारी आमदार प्रवीण दटके यांच्या लेखी माफीची मागणी लावून धरली. कोरोनाच्या काळात प्राण पणाला लावून अधिकारी काम करीत असून भाजप नेते त्यांचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोपही युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. अधिकाऱ्यांच्या समर्थनात घोषणाबाजी करताना युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी. (व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)