• 6 years ago
नागपूर : पावसाळा सुरू झाला की, नागपूरकरांना उत्सुकता असते ती अंबाझरी 'ओव्हरफ्लो' होण्याची. नागपूरचे 'पिकनिक स्पॉट' म्हणून ओळख असलेला हा तलाव दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट महिन्यात 'ओव्हरफ्लो' होतो. मात्र, यंदा जुलैमध्येच नागपूरकरांना हा आनंद अनुभवायला मिळाला. बुधवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने तलाव तुडुंब भरून दुथडी वाहू लागला. गेल्या काही वर्षांमध्ये हे पहिल्यांदाच घडले. तलाव 'ओव्हरफ्लो' झाल्याची वार्ता पसरताच अनेकांनी अंबाझरीकडे सहपरिवार धाव घेत 'ओव्हरफ्लो'चा आनंद घेतला. यावेळी 'यंगस्टर्स'चीही अंबाझरी परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. (व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)

Category

🗞
News
Comments

Recommended