लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था हा जणू अनेक शाखा असणारा विशाल वृक्ष. या विशाल वृक्षाच्या अनेक शाखा आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री डॉ. श्री. सतीश चतुर्वेदी आणि श्रीमती आभा चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली 2008 साली जे. एल. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्थापना झाली.
"प्रियदर्शिनी जे. एल. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग' या नावाने अभियांत्रिकी शिक्षण देण्याची अग्रेसर व सर्वश्रुत अशा या महाविद्यालयाची ओळख निर्माण झाली आहे. डॉ. अभय शेंडे, प्राचार्य यांच्या अत्यंत सक्षम नेतृत्वामुळे महाविद्यालय अकॅडमिक व इतर विविध क्षेत्रांत नावारूपास आले आहे.
नागपूरनगरीत मध्यभागी असणारे पीजेएसीई हे महाविद्यालय पर्यावरणाला अनुकूल व गर्द हिरवागार परिसर व आकृष्ट करणारी भव्य अशी महाविद्यालयाची इमारत प्रथमदर्शनीच विद्यालयाच्या मोहात पाडते. परिसरापासून ते वर्गखोल्यापर्यंत स्वच्छतेचा जागर केला आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात सुसज्ज ग्रंथालयासह अत्याधुनिक प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब, कॉमनरूम, रीडिंगरूम, कॅफेटेरिया, स्पेसीअस क्लासरूम, ड्रॉइंग हॉल, सेमिनार हॉल, एसी कॉन्फरन्स हॉल व इतर सुविधांसोबत प्रभावी शैक्षणिक गुणवत्ता व अंमलबजावणीमुळेच महाविद्यालयाला नॅक समितीने "अ' श्रेणी बहाल केली व अलीकडेच महाविद्यालयाला आयएसओ-9001-2015 चे नामांकन प्राप्त झाले.
user connect initiative by Priyadarshani College of engineering
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.