• 6 years ago
तोंडापूर (ता. जामनेर) : दोन काळवीट एकमेकांशी भिडले आणि त्‍यांची जोदरार लढाई सुरू झाली. यात दोघांचे शिंग एकमेकांमध्ये गुंतल्‍याने त्‍यांची सुटका झाली नाही. बराच वेळ सुटण्याची धडपड केली पण होवू शकली नाही. अशात शेतातील ठिबक नळ्या देखील गुंढाळल्‍या गेल्‍या होत्‍या. शेतकऱ्यांनी या नळ्या कापून दोन्ही काळवीटांची सुटका केली; यानंतर दोन्ही काळवीट जंगलात सुसाट वेगाने गायब झाले. दरम्‍यान काळवीटांच्या टक्करीत शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचे व ठिंबक नळ्याचे नुकसान झाले आहे.

Category

🗞
News

Recommended