• 6 years ago
शरिराला पोषणमुल्यांची गरज असते. जसे की, मसाले, भाज्या, अंडी, मांस, मासे, धान्य-कडधान्यांतून शरिराला पोषणमुल्ये मिळतात. यामुळे शरिर सदृढ राहते. शरिर कोणत्याही आजाराला बळी पडत नाही; पण 2011 ते 2020 या दहा वर्षाच्या कालावधीचा आढावा घेतला तर मसाले, धान्य-कडधान्यांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ प्रत्येक किलोमागे दोन ते दहा टक्‍क्‍यापर्यंत गेलेली दिसते. असे असताना, दररोजची भाजी, आमटीसाठी इतके महाग कडधान्ये घ्यायचे कसे, असा प्रश्‍न घरांतील गृहिणींना पडला आहे. पाच माणसांचे कुटूंब धरले तर दर महिन्याला एक ते दोन किलो धान्य-कडधान्ये, भाजी लागते. ज्यांचे कुटुंब मोठे आहे, तिथे तर एक किलोपेक्षा जास्त धान्य-कडधान्ये लागतात. अशावेळी दर वाढल्याने कुटुंबातील आर्थिक गणिताची कसरत सुरु आहे. दर वाढल्याने ही पोषणमुल्ये दररोज मिळतील का हा प्रश्‍न आहे. यावर व्यापारी काय म्हणतात ते पाहा.

रिपोर्टर/व्हिडीओ : अमोल सावंत

Category

🗞
News

Recommended