• 6 years ago
निळेभोर आकाश अन्‌ पिंजारलेल्या ढगांच्या तुकड्यांमध्ये आज एक नवल घडले. सुर्याच्या भोवती इंद्रधनुष्याचे खळे तयार झाले. साडेबारा ते दिड वाजण्याच्या सुमारास हे इंद्रधनुष्याचे खळे तयार झाले. नंतर ते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हळूहळू लुप्त झाले. सुर्याभोवती इंद्रधनुष्याचे खळे दिसणे ही चमत्कारीक घटना असली तरी ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. असे म्हणतात की, इंद्रधनुष्य तयार झाले की, पाऊस लांबतो किंवा पाऊस भरपूर पडतो. सामान्य लोकांमध्ये मात्र ते कुतूहल असते.



बातमीदार - अमोल सावंत


व्हिडीओ - बी. डी. चेचर

Category

🗞
News

Recommended