• 6 years ago
कोल्हापूर : पूर्वी केक साधे मिळायचे. काळानुरुपे केक बदलत गेले. आता कस्टमाईज्ड अन्‌ थीम केकला सर्वाधिक मागणी आहे. पार्टी, वेडिंग, बर्थ डे, लग्नाचा वाढदिवस अशा अनेक सेलिब्रेशनमध्ये थीम, कस्टमाईज्ड केकला अधिक मागणी वाढत आहे. थीम केक म्हणजे, पार्टीमध्ये किंवा वाढदिवसामध्ये जे पदार्थ, रंग, कपडे, फर्निचर असते ते सर्व काही या थीम केकमध्ये साकारलेले असते. असे थीम केक करण्यासाठी तीन ते चार तास लागतात. असे केक काहीसे महाग असतात; पण लोक असे केक केकमेकर्सना तयार करायला सांगतात. विशेष म्हणजे, असे केक क्षणात जिभेवर विरघळून जातात. कस्टमाईज्ड केकही अशा पद्धतने तयार केलेले असतात. कोल्हापुरात थीम अन्‌ कस्टमाईज्ड केक हे माशाभाई अंकल इंडो बेकरी अग्रेसर आहे. जी थीम पाहिजे, ती थीम केकवर साकारली जाते.

व्हिडीओ : अमोल सावंत

Category

🗞
News

Recommended