• 6 years ago
उमरेड (जि. नागपूर) : ओमनगर स्थित ओमनागरी पतपुरवठा संस्थेमध्ये अनेक वर्षांपासून नागरिकांच्या ठेवी स्वीकारले जात होते. संस्थेचे अभिकर्ते ठेवीदारांकडून वेळेत ठेवी गोळा करून घेत होते. काही ठेवीदारांच्या ठेवीची परिपक्वता तिथी पूर्ण झाली असून, त्यांना त्यांची रक्कम देण्यास संस्थाचालकांचे मार्फत नकार देण्यात येत होता. अनेकदा संस्थेचे अध्यक्ष याशिवाय उर्वरित दहा संचालक मंडळातील सदस्यांकडे वारंवार पैशाची मागणी करून सुद्धा उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. मंगळवार १३ ठेवीदारांनी संस्थेचे अध्यक्ष यांच्यासह संचालक मंडळाच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणाले पुढील पाच ते सहा महिन्यांत सर्व ठेवीदारांचे जवळपास ७० लाख रुपये परतफेड करण्याची जबाबदारी घेतो. (व्हिडिओ - सतीश तुळसकर)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Category

🗞
News

Recommended