कऱ्हाड - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सैदापूर येथे सर्व व्यवहार बंद ठेऊन ग्रामस्थांनी बंदला प्रतिसाद दिला. आजही (रविवार) सर्व व्यवहार बंद होते. अत्यावश्यक सेवेत औषध दुकाने वगळता दूध विक्री सकाळी दोन तास होती. व्यवहार सुरू ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे सर्व पक्षांतर्फे जाहीर केले होते.
त्यामुळे सैदापूर, विद्यानगर भागात कडकडीत बंद पाळला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थ व सर्व पक्षांतर्फे गुरुवारपर्यंत (ता. 24) बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
सैदापूरला कालपासून बंद पाळण्यात आला आहे. सैदापूर व विद्यानगर ग्रामस्थ, सर्व व्यापारी, सर्व दुकानदार, हॉटेल, स्नॅक सेंटर, चहाची टपरी, भाजी विक्रेते, फिरते व्यावसायिक सहभागी झाले. त्यानुसार आजही बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. परिसरातील सहकारी संस्था, बॅंका, पतसंस्था, खासगी संस्थांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी घेतला आहे. त्यात सहभागी होण्याचे त्यांना आवाहन केले होते.
Video : सुरेश डुबल
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Karad