कोल्हापूर - त्या तिघी वेगवेगळया क्षेत्रातील. तिघीही उच्चशिक्षित आणि मैत्रिणीही. वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या. तिघींनाही शेती, गोपालन म्हणजे काय हे माहीत नाही. तीन वर्षांपूर्वी या तिघींनी 20 गाईंचा गोठा उभा केला. नोकरी, घर सांभाळत गो संगोपनाची जबाबदारी लिलया पेलत आहेत.
बातमीदार : नंदिनी नरेवाडी
व्हिडिओ : बी डी चेचर
#kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews