• 6 years ago
- कुंभी, कासारी, कडवी प्रकल्पाच्या सल्लागार समितीची बैठक सिंचन भवन येथे झाली. पाटबंधारे विभागाने तीन वर्षांसाठी विस्तृत आराखडा तयार करावा, अशा सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.

- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याकर्त्यांचा मेळावा झाला. यामध्ये ए. वाय. पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्णय अंतिम असेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

- श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवानंतर होणारा प्रसाद फटाफट डिलिव्हरी कंपनीचे केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वीस रायडर्सच्या माध्यमातून घरपोच पोहोचविला.

- सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या आत्मदहनास जबाबदार असलेल्या संबंधितांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर भोरे कुटुंबियांनी लाक्षणिक उपोषण केले.

- परिक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ संधी देणार आहे. यासाठी येणाऱ्या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे शिवाजी विद्यापीठाने सांगितले.

- तिसऱ्या विंटेज फिल्म फेस्टिव्हलमध्ये 115 लघुपट दाखविले. जगभरातील रसिकांचा, चित्रपटकर्त्यांचा प्रतिसाद मिळाला.

बातमीदार - अमोल सावंत

व्हिडीओ - मोहन मेस्त्री

Category

🗞
News
Comments

Recommended