गुमगाव (जि. नागपूर) : कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी प्रत्येक सण, उत्सवावर मर्यादा आल्याने सहा-सात महिन्यात झालेले सगळे सण नुकसानच करून गेले. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाला मंडळांकडून मूर्तीची मागणी नव्हती. त्यासोबतच माठ विक्रीही झाली नाही. आर्थिक संकटातील कुंभार बांधवांची सारी मदार आता दिवाळी सणावर आहे. परंतू पारंपरिक कुंभार व्यवसायामध्ये आता व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात 'एन्ट्री' केल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कुंभार बांधवांची दीपावली सुद्धा काळोखातच जाण्याची शक्यता आहे. कुंभार समाज पिढीनपिढ्या वर्षभर मेहनत करून मूर्ती, पणत्या, मडके घडवून आपली उपजीविका भागवतात. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या प्रदूर्भावाने कुंभार बांधव आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. ऐन दीपावलीमध्ये व्यवसायात झालेल्या व्यापाऱ्यांच्या प्रवेशाने 'लक्ष्मी' घडविणाऱ्या कुंभार बांधवांच्या नशिबात यंदाही 'अंधारच' असल्याचे दिसून येते.
(व्हिडिओ : रविंद्र कुंभारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.