• 6 years ago
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौर्यावर आहेत. यावेळी ते बाँलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात निर्माण होणार्या फिल्मसीटीत योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बाँलिवूडला न्यायचंय. त्यांच्या याच कृतीला मनसेने आता होर्डिंगच्या माध्यामातून उत्तर दिलंय. मुंबईत योगी आदित्यनाथ ट्रायडंट हाँटेलमध्ये वास्तव्यास आहेत. याच हाँटेलच्या खाली मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा "ठग" म्हटलंय. मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचे स्वप्नं असल्याचंही त्यांनी होर्डिंगमध्ये म्हटलंय. हेच होर्डिंग भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेरही लावण्यात आलंय.
#yogiadityanath #uttarpradesh #versus #maharashtra #marathilanguage #businesses #hiddenagenda #speakfreely #expressyourself #news #sakal #Sakalnews #viralopinion #MarathiNews #marathinewsupdates #MaharashtraVsYogi
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Category

🗞
News

Recommended