संसदेच्या नव्या इमारतीचं भुमीपूजन आज झालं. हिंदू-बौद्ध-इस्लाम-ख्रिश्चन अशा सर्व धर्मियांच्या धर्मगुरुंना बोलावून या पूजनाचा कार्यक्रम पार पडला. संसदेच्या पुन:बांधणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना केंद्राने या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही, गणराज्याची ग्वाही 'आम्ही भारताच्या लोकांनी' देऊन ती स्वत:प्रतच अर्पण केलेली आहे. असं असताना या मूल्यांना साक्षी ठेवून जिथे कायदे केले जातात, त्या संसदेचे पावित्र्य हे संसदेच्या इमारतीच्या उभारणीवेळीच सरळसोटपणे पायदळी तुडवले जात असल्याची चर्चा सध्या होत आहे. धर्मनिरपेक्ष संविधानाच्या मुशीतून साकार होणाऱ्या संसद भवनाच्या इमारतीचे भुमीपूजन कितपत योग्य आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण 'आज काय विशेष'मध्ये करु...
#NewParliament #Bhoomipoojan #NarendraModi #Parliament #CentralVista #Secularism #IndianConstitution #NewParliament4NewIndia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.