भारत पाकिस्तान सामना अगदी उद्यावर येऊन ठेपलाय. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांची उत्कंठा अगदी शिगेला पोचली आहे. पाकिस्तानविरुद्धचा हा सामना जिंकलाच पाहिजे यासाठी विविध पद्धतीने भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. या शुभेच्छा देण्यासाठी अनोख्या पद्धतीचाही अवलंब केला जात आहे. पुण्यातल्या काही क्रीडाशौकीनांनीही अशाच आगळ्यावेगळ्या पद्धतीने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.