पंचगंगा प्रदूषणमुक्तीला "सकाळ'मुळे नवे बळ
कोल्हापूर - "सकाळ'ने पंचगंगा वाचवण्याची हाक दिली आणि या हाकेला हजारो लोकांची साथ लाभली. सामान्यातील सामान्यांबरोबरच शहराचे आजी-माजी लोकप्रतिनिधी या उपक्रमासाठी धावून आले. या उपक्रमामुळे पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या चळवळीला नवे बळ मिळाल्याच्या प्रतिक्रिया लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने व्यक्त केल्या.