रत्नागिरी - जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा सध्या गाजतोय. काहीही करून हा प्रकल्प करणारच, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच घोषित केले. पण, ज्या माडबन- मिठगवाणे गावात हा प्रकल्प होणार आहे, त्या गावात मात्र अजूनही विरोधाचे वातावरण आहे. किंबहुना तो दिवसेंदिवस तो अधिकच तीव्र होत चालला आहे. सरकार काही जाहीर करो, परंतु आपला या प्रकल्पाला ठाम विरोध राहील, असे ग्रामस्थ ठामपणे सांगत आहेत. प्रकल्पाच्या या भूमीत नेमके काय सुरू आहे, याचा साम मराठीने घेतलेला आढावा.