"पोषण आहार', आणि तोही जमिनीत. एकावं तेवढं नवलंच. अमरावती जिल्ह्यातील माहुली-जाहांगीर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात जमिनीत गाडलेला शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा सापडला आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.