खाणकाम गैरव्यवहारात मान अडकलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी पक्षाच्या आदेशानंतरही अडून बसलेत. नव्या नेतानिवडीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंह आणि अरुण जेटली उद्या बंगळुरुमध्ये दाखल होणार असले तरी आपल्या जागी सदानंद गौडा यांची वर्णी लागली तरच राजीनामा देऊ, अशी भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे.