Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ऑक्सिजन टँकरला सातारा शहरानजीक गळती लागली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेला ऑक्सिजनचा टँकर अचानक थांबला. यावेळी टँकरमधून मोठ्या प्रमाणात आवाज येऊ लागल्याने ड्रायव्हर घाबरला. खाली उतरून पाहिले असता टँकरच्या पाठीमागून ऑक्सिजन गळती सुरू झाली होती. गळती थांबविण्यासाठी तातडीने तंत्रज्ञ बोलाविण्यात आले.

Category

🗞
News

Recommended