पीएमपीएमलचा कारभार सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांची पीएमटीवर नियुक्ती केल्यानतंर मुंढेनी प्रशासलनाला चांगलेच वठणीवर आणुन शहरात बसेसची संख्या वाढवल्याने पुणेकरांनी समाधान व्यकत केल असुन पीएमटीचा कारभार अधिकाधिक सुधाराव यासाठी सामाजिक संस्थाही मुंढे मदत करत आहे .मुंढेनी आता पीएमटीच्या वाहनचालकांसाठी मोफत नेत्रतपासणीचा उपक्रम सुरु केला असुन यामध्ये कम्युनिटी आय केअर फांऊडेशनच्यावतीने ही मोफत नेत्रतपासणी केली जात आहे.. याची सुरवात स्वता तुकाराम मुंढे यांनी केली असुन येत्या दोन दिवसांत कामगारांची तज्ञ डाँक्टरांकडुन डोळयांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे शहरात होणारे अपघात,डेपो बसेस दुरुस्ती करताना डोळयांना त्रास होऊ नये यासाठी हा उपक्रम राबिवण्यात आला आहे. या उपक्रमाचे कामगारांनीही कौतुक केलय