Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
महिलांच्या सोनसाखळ्या चोरीच्या तपासाविषयी भाजप आमदारांकडून पोलिसांच्या कामगिरीच्या कौतुकाच्या शब्दांची शाई वाळण्याआधीच भाजपच्याच वर्षा भालेराव या नगरसेविकेचे मंगळसूत्र खेचण्यात आले. या नगरसेविकेने स्वतःच सोनसाखळी चोऱ्यांविरोधात आवाज उठवत होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या सौ. भालेराव यांनी पोलिस, आमदार या सगळ्यांवर अविश्‍वास दाखवित थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे. त्यामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ उडाली.

Category

🗞
News

Recommended