'मी लाभार्थी' या जाहिरातीवरून राज्यात गोंधळ सुरू असतानाच सरकार या जाहिरातीच्या परवानगीवरून पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 1 जानेवारीपासून राज्यात विविध वृत्त वाहिनीवर 'मी लाभार्थी' आणि आपले सरकार ही जाहिरात सुरू आहे. मात्र या जाहिरातीसाठी सरकारने आतापर्यंत सेन्सॉर बोर्डाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल सांगत आहेत निखिल मस्के हे माहिती अधिकार कार्यकर्ते
Comments