नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी झाल्याने उड्डाण करताच दोन मिनीटातच त्याचे इमरजन्सी लॅंडींग करावे लागले. त्यातील प्रवासी कमी केल्यावर मुख्यमंत्री औरंगाबादच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवान झाले. मात्र यानिमित्ताने मुख्यमंत्री आणि हेलीकॉप्टर यांच्याशी संबंधीत ही आणखी एक घटना असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.