पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चौडी (ता. जामखेड) येथे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या कार्यक्रमात धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दोन गटांनी गोंधळ घातला. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. कार्यकर्त्यांना पोलिस पकडून नेत असताना त्यांच्यावर दगडफेक झाली.