Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर वाढीसाठी आंदोलनास पंढरपूर तालुक्यात सुरूवात, आज सकाळीच ग्रामदैवत मारूती ला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक केला.
दुध दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यभर दूध बंद आंदोलन सुरू केले आहे. आज पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथून दूध दर वाढ आंदोलनास सकाळीच सुरूवात झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, उपाध्यक्ष धनंजय पाटील यांच्या सह दूध उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी दूध आंदोलनास सुरूवात केली.

सोलापूर जिल्ह्यातील गादेगाव हे पहिल्या पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनाचे केंद्र आहे. आज शांततेत आंदोलन सुरू केले आहे.

Category

🗞
News

Recommended