Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांनी गणेशोत्सवात घराबाहेर पडु नये तसेच घरच्या गणपतीचे घरीच विसर्जन करावे, यासाठी नागरीकांमध्ये जागृती करण्यासाठी पुणे पोलिसांकडुन गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर खास लघुपट तयार करण्यात आला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ व पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या लघुपटामध्ये नामवंत अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री श्रुती मराठे, पौर्णिमा मनोहर, अभिनेता ओम भुतकर, क्षितिज दाते, शिवराज वायचळ, बालकलाकार रेणुका राहुल देशपांडे या कलाकारांनी त्यामध्ये अभिनय केला आहे. दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केले आहे. कथा विनोद सातव यांची असून अभिनेता सुबोध भावे यांनी विशेष सहकार्य केले आहे. तर लघुपटाची संकल्पना व निर्मिती युवा उद्योजक पुनीत बालान यांनी केली आहे.

ताज्या बातम्या वाचा फक्त www.sarkarnama.in वर.!⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣
⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣
#news #MarathiNews #Maharashtra #viralnews #viralpost #trending #insta #BreakingNews #Sarkarnama #instapost #instanews #instaviral #SarkarnamaNews #topnews #politics #shortfilm #video #viralvideo

Category

🗞
News

Recommended