Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
गेल्या चोवीस तासात मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. अजूनही तुफान पाऊस सुरु आहे. प्रशासनाने सर्व खासगी व सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर केली आहे. काल पासून मुंबई, ठाणे, पालघर यासह राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.

या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पाणी तुडुंब भरत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरात राहावे, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. या संपूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्या असून आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

Category

🗞
News

Recommended