परभणी : मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन हे दिवसेंदिवस तीव्र व्हायला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाचे आरक्षण हे तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी आज मानवत तहसील समोर मराठा समाजाच्या आंदोलकांनी कपडे फाडो आंदोलन करत. शासनावरचा आपला रोष व्यक्त केला. व नायब तहसिलदार यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. यापुढेही वेगवेगळ्या प्रकारे हे आंदोलन चालूच रहाणार असा इशारा यावेळी देण्यात आला.