बिहारमध्ये गुप्तेश्वर पांडे आणि शिवसेनेत रंगणार सामना...बिहार निवडणुकीत शिवसेना ५० उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. २०१५ मध्ये शिवसेनेनं ८० जागा लढवत २ लाखांपेक्षा जास्त मत घेतली होती यंदा शिवसेना ५० जागा लढवून इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई पोलीसांवर ज्या डीजीपी पांडेनी संशय व्यक्त केला गेला होता त्याच पांडेना टक्कर द्यायला शिवसेनेचा मावळा सज्ज झालाय असं मत शिवसेना खासदार अनिल देसाईंनी व्यक्त केलं आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात झालेल्या बदनामीनंतर शिवसेना वचपा घेण्यासाठी सज्ज झाली आहे.