Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
उदयनराजेंना बाईक सवारी करणे अधिक पसंत असून त्यांनी वेळोवेळी याची प्रचिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उदयनराजेंची बुलेट सवारी करत आपला खासदारकीचा उमेदवारी अर्ज भरला होता. याची समाज माध्यमांवर खूपच चर्चा झाली. दयनराजेंचे चाहते जेव्हा नवीन बाईक विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतातच. शिवाय गाडीत काही वेगळं केलं असेल तरीही ते उदयनराजेंना दाखवायला येतात. असच काहीसं गुरुवारी (ता. २२ ) घडले. एक कार्यकर्ता जलमंदिर पॅलेस येथे त्याची स्वत:ची नवी गाडी घेऊन जलमंदिर पॅलेस येथे आला. राजेंना त्याने गाडी दाखवताना त्यांनी ही गाडी चालवून पाहावी असा त्याने आग्रह धरला. कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करत ते बाईकवर स्वार झाले. त्यांनी पहिला गिअर उचलत गाडी स्टार्ट करत स्पीड वाढवला. जलमंदिर पॅलेसपासून ते नगरपालिकेच्या पोहण्याच्या तलावापर्यंत त्यांनी शंभरच्या स्पीडने दोन राऊंड मारले

Category

🗞
News

Recommended