शिर्डी जवळच्या कोपरगावमध्ये मनसेने खळखट्याक आंदोलन केले. वाढीव वीज बिलांच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यालय फोडले. कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयात घुसून काचा आणि खुर्च्यांची तोडफोड केली. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.