Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सहभागी व्हावे अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांची भेट घेतली. राळेगण सिद्धी येथे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अण्णांची भेट घेऊन अण्णा हजारे यांच्या सोबत चर्चा केली. सुरुवातीला या शिष्टमंडळाने राळेगण सिद्धीत थाळी वाजवून अण्णांनी आंदोलनात सहभागी व्हावे अशी मागणी केली. दिल्ली येथील जंतर-मंतर किंवा रामलीला मैदानात परवानगी मिळाली तर आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी यावेळी दिला.

Category

🗞
News

Recommended