महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन ॲड. ठाकूर यांनी याबाबतचे निवेदन दिले. याबाबत त्या म्हणाल्या, एमपीएससी परीक्षेचं संघीकरण करण्यात येत असून परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजपा धार्जिणा राजकीय प्रचार तसेच काँग्रेसविरोधी भूमिका रुजविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं निदर्शनास येत आहे, असे त्या म्हणाल्या.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics