Satara : साता-याच्या प्रद्युम्न धुमाळची स्कॉटिश घाेडेसवारी अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
Ireland : येथे नुकत्याच झालेल्या 'सेमालीस किलगिलकी इंटरनॅशनल हॉर्स ट्रायल'मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत असलेला साता-याचा प्रद्युम्न प्रशांत धुमाळ याने त्याच्या 'स्कायहिल कॅव्हलियर' नावाच्या अश्वासोबत 200 स्पर्धकांमध्ये 14 वे स्थान पटकावले. त्याच्या या कामगिरीमुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा देशाचे आणि राजधानी साता-याचे नाव उंचावले गेले आहे.
या स्पर्धकांमध्ये आयर्लंड, इटली, हॉलंड देशांचा समावेश होता. प्रद्युम्नची ऑगस्टमध्ये होणाऱ्या स्कॉटिश घाेडेसवारी अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे अशी माहिती त्याचे वडील प्रशांत धुमाळ यांनी दिली.
#semaleaseinternationalhorsetrial #ireland #satara