मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे सैराट. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांना जणू काही याड लावलं. सैराटसह नागराजच्या पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री चित्रपटावरही रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि पसंती दिली. एक संवेदनशील दिग्दर्शक अशी नागराजची ओळख बनलीय. एकीकडे दिग्दर्शक म्हणून नाव होत असताना नागराजच्या वैयक्तीक आणि वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. १७ मे १९९७ साली नागराजचे सुनीतासह लग्न झाले. अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. यातील एका फोटोत लग्न पार पडल्यानंतर नागराज आणि सुनीता खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. दुसऱ्या एका फोटोत नागराज पत्नी सुनीताला घरात गेल्यानंतर मिठाई भरवत असल्याचे दिसत आहे. यांत नागराज आणि सुनीता आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र त्यांचा सुखी संसार फार काळ काही टिकला नाही. पहा हा सविस्तर विडिओ -
#lokmat #NagrajManjule #Sairat #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments