Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मोठ्या शहरांमध्ये फेरीवाल्यांची मजल कुठवर गेलीये हे पुन्हा अधोरेखित करणारी धक्कादायक बातमी ठाण्यातून आलीये. ठाण्यातील कासारवडवली भागात ठाणे मनपाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची दोन बोटं फेरीवाल्यांच्या हल्ल्यात छाटली गेलीयेत. पिंपळे कासारवडवली भागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या.. आरोपी अमरजीत यादव याच्या स्टॉलवर पिंपळेंनी काही दिवसांपूर्वीच कारवाई केली होती.. त्याचा राग त्याच्या मनात होता.. जेव्हा पिंपळे पुन्हा कारवाई करायला गेल्या, तेव्हा यादवनं मोठा चाकू काढला आणि पिंपळेंवर हल्ला केला.. हल्ला इतका भीषण होता की एका क्षणात पिपंळेंची दोन बोटं छाटली गेली... त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिस जेव्हा या आरोपीला पकडण्यास गेले, तेव्हाही त्यानं कांगावा केला, आणि मी आत्महत्या करीन अशा धमक्या देऊ लागला. पोलिसानं यादवला अटक केलीये. पण या घटनेमुळे ठाणे आणि मुंबईत खळबळ उडालीये..
#fingerscut #fingerschoppedinattack #kalpitapimple #thane #thanenews #thaneliveipdates #thanenewsupdate

Category

🗞
News

Recommended